मुंबई येथे ५ जुलै रोजी साजरा होणाऱ्या विजयी मेळाव्याला सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक जाणार-सुशांत नाईक
देवगड : देवगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजय म्हणून फटाके लावत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मराठी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जय भवानी जय जय शिवाजी, उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अश्या घोषनांनी संपूर्ण परिसर दनानून सोडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या समोर सरकार ने नमती बाजू घेऊन हिंदी सक्ती विरोधातला जीआर रद्द केला. या हिंदी सक्ती च्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूनी आवज उठवला व संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने यांना साथ देऊन सरकार मराठी माणसांवर लादत असलेली हिंदी सक्ती मोडून काढण्यात आली. मुंबई येथे 5 जुलै रोजी साजरा होणाऱ्या विजयी मेळाव्याला सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक सामील होणार असल्याचे यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.
यावेळी माझी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख यदुठाकूर देसाई, संदीप कदम, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, महिला तालुका संघटक हर्षा ठाकूर, तालुका प्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, उपतालुका प्रमुख दादा सावंत, माजी सभापती संजय नेरुरकर, विभागप्रमुख संतोष दळवी, विष्णु घाडी, प्रसाद दुखंडे, काका जेठे, गणेश वाळके, सचिन लोके, लक्ष्मण तारी, रमा राणे, गौरव सावंत, जितू जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.