15.2 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला विशाखा पुरस्कार प्रदान

कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या बहुचर्चित काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र च्या वतीने देण्यात येणारा विशाखा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ च्या नाशिक येथील सभागृहात 30 जून रोजी विशाखा काव्यपुरस्कार पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रदान प्रदान करण्यात आले.सन 2018 ते सन 2024 या सात वर्षांतील एकूण 22 साहित्यिकांना प्रथम,द्वितीय आणि तृतीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी प्रकुलगुरु प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला सन 2022 सालसाठी चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. 21 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. थोर साहित्यिक दिवंगत विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. नाशिक चे सुपुत्र , ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील साहित्यिकांच्या प्रथम काव्यसंग्रहास त्यावर्षीचा विशाखा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार निवडीसाठी अत्यंत पारदर्शकपणे त्रिस्तरीय निवड पद्धतीने निवड केली जाते.सरिता पवार यांचे कथा काव्य ललित लेख प्रसिद्ध असून राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला मध्यप्रदेश राज्यातील वसंत राशीनकर काव्यासाधना पुरस्कार,
काव्यरासिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह,एटीएम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार, राज्यस्तरीय सारांश पुरस्कार मिरज,राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार बुलढाणा,राज्यस्तरीय आई पुरस्कार राजापूर, सावित्रीबाई फुले पुरस्कार वेंगुर्ले, कोमसाप चा नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार आदी महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशाखा पुरस्कारप्रदान झाल्याबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!