कणकवलीत बऱ्याच भागांमध्ये पुरसदृश्य
स्थिती ; वाहतूक ठप्प
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आल्याने गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. आचरा राज्यमार्गावर पाणी आले असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने वाहनचालकांना सतर्कतेसाठी आचरा मार्गावर बॅनर लावण्यात आले असून वरवडे गावातून बिडवाडी मार्गे पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र काही हुल्लडबाज तरुण आपला जीव धोक्यात घालून त्याच पाण्यातून वाहने चालवत असल्याचेही निदर्शनास येत आहे. बुधवारी मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने कोसळायला सुरुवात केली. यामध्ये कणकवली तालुक्यातील बहुतांश सखल भागांमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. परिणामी येथील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता तर काही गावांचा पुरसदृश्य स्थितीमुळे संपर्क तुटला होता.
हवामान विभागमे सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहावे. कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.