मृतदेह चेंदवण येथे सापडला
आत्महत्येचे कारण अस्पष्ट, आकस्मिक मृत्यूची नोंद
कुडाळ : कर्ली नदीत उडी घेतलेल्या युवकाचा मृतदेह आज चेंदवण परिसरात आढळून आला. तो नेरुर – चव्हाटावाडी येथील रहिवासी आहे. सागर मारुती नारिंगेकर (वय ३८) असे त्याचे नाव आहे. त्याने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत माहिती मिळू शकली नाही. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी त्याने नेरुरपार येथे पुलावरून नदीत उडी घेत आपले जीवन संपविले होते. हा प्रकार त्या ठिकाणी जाणाऱ्या एका रिक्षा चालकाने पाहिला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला होता. परंतु तो सापडला नव्हता. आज सकाळी त्याचा मृतदेह चेंदवण येथे नदीकिनारी आढळून आला