-3.1 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

ज्येष्ठ दशावतारी कलावंत राजू हरयाण यांचे निधन

कणकवली : जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलावंत व दशावतार कलेतील कॉमेडी चा बादशहा म्हणून ओळख असलेले राजेंद्र सदाशिव हरयाण उर्फ राजू हरयाण (वय ५८) यांचे काल रविवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. श्री हरयाण हे घरी करूळ मधलीवाडी येथे असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांचे जागीच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. दशावतारी कलेमध्ये राजू हरयाण हे नाव एका मोठ्या अदबीने घेतले जात असे. दशावतारी कलेत त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. सध्या ते कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर या दशावतार कंपनीमध्ये होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मोठ्या दिग्गज दशावतारी कलावंतांसोबत त्यांचे नाव घेतले जात असे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!