11 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

चैतन्य दळवीचे SOF ऑलिंपियाड मॅथ्स परीक्षेत यश

कणकवली : SOF फाउंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चा विध्यार्थी कु. चैतन्य श्रीकांत दळवी (इयत्ता दहावी) याने झोन महाराष्ट्र २ या झोनल विभागात ४९५ वा रँक मिळवत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशाबद्दल नुकतेच कु. चैतन्य श्रीकांत दळवी यांस प्रशालेत गौरविण्यात आले.

या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी. पी. तानावडे, मुख्याध्यपिका अर्चना शेखर देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!