24 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

कणकवली | मयुर ठाकूर : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर कणकवली पंचायत समिती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, डॉ. उदय बुचडे, प्रमोद ठाकूर, श्री. कापसे, आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!