29.1 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

कणकवली उड्डाणपुलावर ट्रक आणि मोटरसायकलमध्ये अपघात

कळसुली येथील भाजप पदाधिकारी शामसुंदर उर्फ शामू दळवी यांचे अपघातात निधन

कणकवली : भाजपचे कळसुली पंचायत समितीची शक्ती केंद्रप्रमुख श्यामसुंदर ऊर्फ शामु नाना दळवी वय ६२, राहणार कळसुली लिंगेश्वरवाडी यांचे कणकवली येथील महामार्गाच्या उड्डाणपुलावर मोटर सायकल आणि ट्रक यांच्यात झालेला अपघातात गंभीर दुखापत होऊन निधन झाले. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दळवी हे जागीच गतप्राण झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे.

कणकवली पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुचिता दळवी यांचे ते पती होत.
आज २० जून रोजी रात्री ८ वा.च्या सुमारास जाणवली येथून वागदे च्या दिशेने जात असताना महामार्गावरील उड्डाणपुलावर शामसुंदर दळवी यांचा हा अपघात झाला. ट्रक ची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यात त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धाव घेत त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने भाजप कणकवली तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!