14.4 C
New York
Sunday, October 12, 2025

Buy now

चोरट्यांना रोखण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही तात्काळ सुरू करा

बांद्यातील युवकांची मागणी; पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांना निवेदन

बांदा : शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सद्यस्थितीत तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. त्यामुळे भुरट्या चोरांना आयती संधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील भर बाजारपेठेतून बुलेट दुचाकी चोरून नेण्याची घटना घडली आहे. त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावे, अशी मागणी बांद्यातील युवा नेते, युवा उद्योजक अर्णव स्वार आणि युवकांनी केली आहे. याबाबत बांद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बांदा ही महत्त्वाची बाजारपेठ असून या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. सोमवारी आठवडा बाजार तसेच इतर दिवशी शहरात पाकीट मारी किंवा चोरीच्या घटना सर्रासपणे घडत आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने या घटनांचा तपास करणे हा पोलिसांसाठी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घटनांचा तसेच शहरातील चोरी, छेडछाड तसेच इतर गुन्ह्यांचा तपास करणे हे सीसीटीव्ही मुळे सोपे होणार आहे. यासाठी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात-लवकर कार्यान्वित करावेत. यावेळी अर्णव स्वार, प्रथमेश गोवेकर, गौरव नाटेकर, भाऊ वाळके, मयुरेश महाजन, ऋषी हरमलकर, राज हरमलकर, साहिल कल्याणकर, रितेश नाटेकर, प्रियेश नाटेकर, रोहित काणेकर, सिद्धेश मोर्ये, साईश मोर्ये आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!