-2 C
New York
Wednesday, December 17, 2025

Buy now

गुन्हेगारी, अवैध धंदे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस सक्षम

कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्ह्याची शांतप्रिय जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, अमलीपदार्थांची विक्री, गुन्हे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा सक्षम आहे. पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी अनुभवी असून गुन्हेगारी नियंत्रणात आण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे, अमलीपदार्थांची विक्री, गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आलेली दिसेल, असा विश्वास कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केला.

श्री. दराडे यांनी कणकवली पोलीस स्थानकाला गुरुवारी सायंकाळी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घन:श्याम आढाव, कणकवलीचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, भरोसा सेलच्या तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे, श्री. ढबे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, महेश शेडगे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेतील अधिकारी सक्षम आणि अनुभवी आहेत. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवैध धंदे, गुन्हयांपासून मुक्ती मिळेल. अधिकारी व कर्मचारी अनुभवी असल्याने त्यांच्या नजरेतून गुन्हेगार सुटणार नाही. जिल्ह्यत घडलेल्या गुन्हयांचा पोलीस अधिकारी व कर्मचारी छडा लावून त्या गुन्हयांतील आरोपींना जेरबंद करतील. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. जिल्ह्यात अलीकडच्या काळात सायबर क्राईम वाढला असून सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे. कोणताही गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावण्याची क्षमता अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही गुन्हा अंडरटेक राहणार नाही, तो प्रत्येकाचा डिटेक होईल. त्या गुन्ह्यांतील आरोपी हे जेरबंद होतील, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!