13.6 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

मालवण मधील शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं उस्फुर्त स्वागत…!

मालवण : उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षात आज मालवणसह जिल्ह्यातील शाळा पुन्हा सुरु होऊन विद्यार्थ्यांच्या आगमनाने महिनाभरानतर गजबजून गेल्या मालवण मधील शाळांमध्ये आज विद्यार्थी तसेच नवागतांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व प्राथमिक शाळेत देखील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून, गुलाब व लाडू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्येची देवता सरस्वती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करीत तसेच गुरुजनांना वंदन करीत हसतमुखाने शाळेत प्रवेश केला यावेळी राज्यशासनाच्या मोफत पाठयपुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक हणमंत तिवले, लोकल कमिटी सचिव दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना पर्यवेक्षक आर डी बनसोडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!