-1 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

जनतेचे प्रश्न लक्षात ठेवून तशी विकास कामे करणार – आम. नीलेश राणे

सिंधुदुर्गनगरी येथील भव्य सभामंडपाचा शुभारंभ

सिंधुदुर्ग : आपल्या मतदार संघाचा विकास हा त्या भागातील जनतेच्या प्रश्नाची जोडला गेला आहे व याचाच अभ्यास करून आम. निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघात कामांचा धडाका सुरू ठेवला आहे. आज या मतदार संघात लोकोपयोगी अनेक कामांचे शुभारंभ झाले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद प्राधिकरण वसाहतीमध्ये एका भव्य सभामंडपाचा शुभारंभ आम. निलेश राणे यांनी शनिवारी केला.

या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, दत्ता सामंत, दादा साइल, भाई सावंत, दीपक नारकर, सौ सुप्रिया ताई वालावलकर, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, ओरोस चे उपसरपंच पांडू मालवणकर, भाई सावंत, उदय जांभवडेकर, छोटू पारकर, कसाल सरपंच राजन परब, ओरोस ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.
सिंधु नगरी या पूर्वी विकास कामांमध्ये मागे पडली होती, परंतू आमचे महा युती सरकार येताच या भागातील अनेक विकास कामे मार्गी लागू लागली आहेत. या भागातील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. असा विश्वास यावेळी आम. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!