15.6 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

कौतुकाची थाप मिळणे प्रत्येकासाठी आनंददायी – दत्तप्रसाद पेडणेकर

मालवण पत्रकार समितीतर्फे गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ : मुलांना प्रोत्साहन देणारा उपक्रम !

मालवण : मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करणे हे प्रत्येकासाठी आनंददायी असते. यात आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून करण्यात येणारे कौतुक नेहमीच प्रोत्साहन देणारे ठरत असते. मालवण पत्रकार समिती नेहमीच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या यशाबद्दल सत्काररुपी कौतुक करत आली आहे. यामुळे आजचा सत्कार हा प्रोत्साहन देण्यासाठीच आयोजित करण्यात आल्याचे तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी सांगितले.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या सदस्य पाल्यांचा (दहावी व बारावी) तसेच चौके सरपंचपदी पत्रकार संघाचे सदस्य पी. के. चौकेकर यांची, तर संग्राम कासले यांची कोळंब पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते भेटवस्तू, रोप व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, माजी अध्यक्ष संतोष गावडे, ज्येष्ठ पत्रकार पी. के. चौकेकर, उपाध्यक्ष विशाल बाईरकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सहसचिव नितीन गावडे, मनोज चव्हाण, समीर म्हाडगूत, संग्राम कासले, भूषण मेतर, भाऊ भोगले, संतोष हिवाळेकर, उदय बापर्डेकर, आप्पा मालंडकर, ओंकार यादव यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

हा कार्यक्रम येथील शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यामध्ये बारावी परीक्षेत तृप्ती संतोष गावडे, दहावी परीक्षेत घृती केशव भोगले, खुशी प्रशांत हिंदळेकर, सिद्धी संतोष हिवाळेकर यांच्यासह चौके सरपंच पी. के. चौकेकर व कोळंब पोलीस पाटील संग्राम कासले यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संग्राम कासले म्हणाले, पत्रकारितेचा अनुभव असल्याने समाजात कशाप्रकारे वावरावे लागते, याचे गणित जुळून येते. पोलीस पाटील पदावर काम करताना एक रुपया न घेता, सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे.

चौके सरपंच पी. के. चौकेकर म्हणाले, आजचा हा सत्कार घरगुती असून त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याची उर्जा मिळत राहील. पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळली परंतु काही कारणास्तव या क्षेत्रातून अलिप्त राहिलो, मात्र मालवण पत्रकार समितीशी नेहमीच जिव्हाळा कायम ठेवला. गुणवंत विद्यार्थ्यांतर्फे तृप्ती आणि सिद्धी यांनी मनोगत व्यक्त करताना हा सत्कार म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींनी केलेले कौतुक आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन सचिव कृष्णा ढोलम यांनी, तर आभार सहसचिव नितीन गावडे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!