कणकवली : खरंतर आजच्या काळात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे फार गरजेचे आहे याच धर्तीवर राष्ट्रीय सेवा योजना या विभागामार्फत आज एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस. बाडकर सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
हा कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिवस याचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले तसेच एक एक व्यक्ती एक झाड हा संकल्प सुद्धा करण्यात आला याचे महत्त्व सर्वांच्या पर्यंत पोहोचवावे हा त्या पाठीमागचा उद्देश होता.
याप्रसंगी एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एस बाडकर सर, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. सचिन वंजारी सर, संगणक विभाग प्रमुख प्रा. दर्शन म्हापसेकर सर, तसेच प्रकल्प अधिकारी प्रा.अरविंद कुडतरकर सर, डॉ.शुभांगी माने मॅडम, प्रा. पेंडसे सर ,तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग ,कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.