22.5 C
New York
Friday, September 19, 2025

Buy now

प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे – अनिल शिंगाडे

मसुरे येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न

मसुरे : दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी गावागावात जाऊन अशा विभाग वार मेळाव्यातून या सर्व बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी आमची संस्था आणि आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. यापुढे सुद्धा या सर्व बांधवांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहून काम करणार आहे. तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी तुम्ही कधीही आवाज द्या मी सदैव तुमच्या सोबत आहे असे प्रतिपादन मसुरे येथे बोलताना सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल चे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले.

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने मसुरे येथे मर्डे ग्रामपंचायत सभागृहात दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी मर्डे ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी शंकर कोळसुलकर , पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते भानुदास धुरी, वेरळ उपसरपंच दिनेश परब, माजी ग्रामपंचायत सदस्य राघवेंद्र मुळीक, संस्था कर्मचारी विशाखा कासले, संजना गावडे, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार संस्था कर्मचारी दीपक चव्हाण, संजना गावडे, विशाखा कासले यांनी केले.

संस्थाध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती तसेच यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत याबाबत दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर म्हणाले शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायती स्तरावरती सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी असून यासाठी दिव्यांग बांधवांना जे सहकार्य लागेल ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण वेळोवेळी देत आहोत. या सर्व बांधवांनी परिपूर्ण कागदपत्रांसहित या सर्व योजनांचा परिपूर्ण लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी. संस्था कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेचे कामकाज आणि दिव्यांग बांधवांसाठी करीत असलेले काम याबाबत अहवाल वाचन केले. या वेळी तीन दिव्यांग बांधवांना पेन्शन योजना करण्यासाठी, सहा दिव्यांग बांधवांना घरघंटी प्रस्ताव करण्यासाठी फॉर्म वाटप करण्यात येऊन कागदपत्रांची माहिती देण्यात आली. अकरा दिव्यांग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली. या मेळाव्याला ४० हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने आसिफ अब्दुल कलाम शेख यांना अंधकाठी देण्यात आली. संस्था कर्मचारी संजना गावडे यांनी आभार मानले. या संस्थेच्या वतीने मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी दिव्यम मापारी लक्ष्मण शिंगाडे रेश्मा पालव मंगल भोगले जयवंत मांजरेकर प्रणाली मापारी सुनील ठाकूर सागर ठाकूर रमाकांत पाटील सुनंदा खरात कृष्णा खोत सूर्यकांत सावंत साक्षी बागवे रुपेश लोखंडे अहमद सय्यद रतन ठाकूर विजयादूखंडे लक्ष्मी शिंदे आधी उपस्थित होते. मसुरे, बांदिवडे खुर्द, बांदिवडे बुद्रुक, वेरळ, बिळवस, देऊळवाडा या गावातील दिव्यांगांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी, ऑनलाइन प्रमाणपत्र, रेल्वे पास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी, घरकुल आदी योजनांची महत्त्वपूर्ण माहिती मान्यवरांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!