22.4 C
New York
Sunday, June 8, 2025

Buy now

कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष अतुल बंगे यांची निवड

सचिव पदी शरद पावसकर, खजिनदार संदीप साळसकर

कुडाळ : कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची जनरल सभा भंडारी समाजाचे जेष्ठ नेते वासुदेव पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. कुडाळ तालुका भंडारी समाजाचा वाद मागील बरीच वर्षे धर्मादाय आयुक्त ओरोस न्यायालयात सुरू होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, सदरची सभा लक्ष्मण केळुसकर यांनी निमंत्रित करावी त्यानुसार आज केळुसकर यांच्या निवासस्थानी जनरल सभा पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी अध्यक्ष अतुल बंगे, उपाध्यक्ष प्रमोद चिंदरकर, सचिव शरद पावसकर, सहसचिव विठ्ठल कांबळी, खजिनदार संदीप साळसकर, सदस्य संतोष चिपकर, गजानन वेंगुर्लेकर, मनोहर आरोलकर, प्रभाकर साळगावकर, विनोद मयेकर, गुरुनाथ सरमळकर, दिलीप तुळसकर, लक्ष्मण केळुसकर, सुभाष सारंग, चंद्रकांत सारंग, सल्लागार – एकनाथ टेमकर, मोहन तांडेल अशा प्रकारची कार्यकारिणी निवडण्यात आली असून आज भंडारी समाजाचे जेष्ठ नेते माजी अध्यक्ष मामा माड्ये यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राजू गवंडे, राजन कोरगावकर, समील जळवी, लक्ष्मण मोरजकर, मंगेश बांदेकर, अनंत वाड्येकर, दर्शन कुडव, विलास पावसकर आदी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला भंडारी समाजातील देवाज्ञा झालेल्या न्यात-अन्यात व्यक्तीना शोक व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!