23.8 C
New York
Sunday, June 8, 2025

Buy now

कीटकनाशक विक्री केंद्राचा परवाना २५ जूनपर्यत निलंबित

सिंधुदुर्गनगरी : कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांनी वैभववाडी तालुक्यातील नारकरवाडी येथील लक्ष्मन सोपान मुंढे यांच्या मालकीच्या कोकण कृषी विकास केंद्राची नियमित तपासणी ४ डिसेंबर २०२४ रोजी केली होती. या तपासणीत, कीटकनाशके अधिनियम १९६८ चे कलम १३, १४ व कीटकनाशके नियम १९७१ चे नियम १० (४, ७), १५ चे उल्लंघन झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कृषी विकास अधिकाऱ्यांनी परवानाधारक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव परवाना प्राधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार कोकण कृषी विकास केंद्राचा परवाना २५ जून २०२५ पर्यंत निलंबित केला आहे.

या प्रकरणी, परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासमोर २६ मे २०२५ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान, कोकण कृषी विकास केंद्राचे लक्ष्मण सोपान मुंढे यांनी कीटकनाशके अधिनियम १९६८ चे कलम १३, १४ व कीटकनाशके नियम १९७१ चे नियम १० (४, ७), १५ मधील कायदेशीर तरतुदींचा भंग झाल्याची बाब मान्य करून यापुढे सर्व कायदेशीर तरतुदींचा पालन करण्याचे कबूल केले आणि कारवाई न करण्याबाबत विनंती केली.

परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी परवानाधारकांचे म्हणणे ऐकून घेतले; परंतु कीटकनाशके अधिनियम १९६८ व कीटकनाशके नियम १९७१ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यामुळे विक्री केंद्राचा कीटकनाशके विक्री परवाना २५ जून २०२५ पर्यंत निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांना कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याबाबत आवाहन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!