11.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

कुडाळदेशकर गौड ब्राम्हण ज्ञातीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या कुडाळमध्ये गुणगौरव सोहळा

कुडाळ : कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने उद्या रविवार ८ जून २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक संकुल एमआयडीसी कुडाळ येथे दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने कुडाळदेशकर ज्ञातीमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. यामध्ये “भेरा” चित्रपटाचे लेखक प्रसाद खानोलकर, चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा खानोलकर, प्रसिद्ध युवा उद्योजक राजेश ठाकुर, आंदूर्ले येथे वासंतीक वर्गाचे आयोजन करणारे मनोहर पाटील व तेजस सामंत, युवा नृत्यांगना दीक्षा नाईक तसेच अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कुडाळदेशकर ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजीत देसाई व सचिव प्रशांत धोंड यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!