18 C
New York
Saturday, August 2, 2025

Buy now

तळकट-भटवाडी येथे आढळला १४ फुटी “किंग कोब्रा”

सावंतवाडी : तळकट- भटवाडी येथील विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर आज दुपारी सुमारे १४ फूट लांबीचा किंग कोब्रा नाग आढळला. त्याला सर्पमित्र विठ्ठल गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. यावेळी तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत, माजी सरपंच रमेश शिंदे, विजयकुमार भिकाजी मराठे, पोलीस पाटील रामदास देसाई, अभिजीत देसाई, उपसरपंच रमाकांत गवस यांच्यासह तळकट पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. किंग कोब्र्याला पकडल्यानंतर त्याला कोणतीही इजा न करता, सर्पमित्रांनी त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!