-0.6 C
New York
Monday, February 23, 2026

Buy now

सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची बदली!

सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची सांगली- मिरज-कुपवाड महानगरपालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. या बदलीमुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. पाटील यांनी आपल्या दोन महिन्याच्या कार्यकालात प्रशासनावर चांगली पकड बसवली होती. पार्किंग सुविधा, गटार सफाई यासाठी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने काही उपक्रम राबवले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची सावंतवाडीत बदली झाली होती. आता त्यांच्या विनंतीवरून पुन्हा सांगली-मिरज – कुपवाड महानगरपालिकेतच उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!