23.9 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या बदल्यांत मोठा घोळ

जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आर. जे पवारांकडे देण्यामागे गौडबंगाल

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप

कणकवली : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या बदल्यांत मोठा घोळ झाला आहे. ३१ मे पर्यंत बदल्या करण्याचे आदेश राज्य शासनाचे असतानाही ३ जून रोजी बदली आदेश काढण्यात आले. स्वतः जिल्हाधिकारी २९ मे पासून ३ जून पर्यंत सिंधुदुर्गात नव्हते. ३ जून रोजी कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन बदली आदेश काढण्यात आले. याबाबत तक्रार करणार असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ओरोस येथून १०० किमी अंतरावर असलेल्या देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे देण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. जिल्हा मुख्यालयात अन्य अधिकारी असतानाही उबाठा शिवसेनेने अवैध सिलिका उत्खनन बाबत उठवलेल्या आवाजामुळे च देवगड तहसीलदार पवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. जिल्हा मुख्यालयात ८ वर्षे नोकरी करत असलेल्या पोळ नामक कर्मचाऱ्याला खनिकर्म अधिकारी कार्यालयात आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. शासकीय नियमानुसार ६ वर्षे सलग जिल्हा मुख्यालयात नोकरी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला अन्य ठिकाणी बदली होणे क्रमप्राप्त असते. मात्र प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याकडून पोळ याना एक वर्ष मुदतवाढ मिळण्यासाठी शिफारस पत्र घेण्यात आले आहे. खनिकर्म निरीक्षक पदी कार्यरत असलेल्या पोळ यांची कार्यपद्धती चुकीची असून याबाबत तक्रार करणार असल्याचेही माजी आमदार उपरकर म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!