कणकवली: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मॉं के नाम अभियानंतर्गत कणकवली पंचायत समितीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. घेवडे, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रमोद ठाकूर, संजय कवटकर, कैलास राऊत, प्रथम जाधव, रामचंद्र नारकर, विशाल शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.