28.3 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

पर्यावरण संवर्धनासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढेल : गौरी पाटील

कणकवली नगरपंचायतच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

कणकवली : कणकवली शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषण कमी करणे आणि हरित कणकवली स्वच्छ कणकवली  घडवण्यासाठी नागरिकांना सहभाग करुन घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.जागतिक पर्यावरण दिनानिमित शहरात वृक्षलागवड करण्यास सुरवात केली असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित कणकवली करण्याचा प्रयत्न असणार आहे.  या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त कणकवली नगरपंचायतच्यावतीने वृक्षारोपण व महिलांसाठी एक झाड उपक्रम ५ जून रोजी राबविण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्र,कणकवली, पर्यटन केंद्र  परिसरात  नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले. या परिसरात २७  स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड  करण्यात आले. यावेळी कणकवली नगरपंचायत प्रशासक  तथा प्रांत अधिकारी जगदीश कातकर, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, शहरातील जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष सीताराम कुडतरकर ,जेष्ठ पत्रकार अशोक  करंबळेकर, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक हरिभाऊ भिसे, कनकसिंधू शहरस्तर संघाच्या सर्व  पदाधिकारी, नगरपंचायतचे सर्व अधिकारी व  कर्मचारी वर्ग आणि नागरिक  यांचा   उत्स्फूर्त सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!