-6.6 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

पिंगुळीत मटका जुगारवर पोलिसांची कारवाई

कुडाळ : पिंगुळी वायमन गार्डन तिठा येथील, एका जनरल स्टोअरच्या बाजूला असलेल्या जुगार मटका अड्ड्यावर कुडाळ पोलिसांनी मंगळवार ३ जून रोजी सायंकाळी कारवाई करत १४ हजार २६० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून सुमारे १४ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघं संशयितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पिंगुळी वायमन गार्डन तिठा येथील, एका जनरल स्टोअरच्या बाजूला जुगार मटका अड्ड्यावर प्रथमेश राघोबा विरनोडकर (वय 26 वर्षे, रा. आरोंदा, बांधवाडी, ता- सावंतवाडी, सध्या रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा तालुका – कुडाळ) आणि खलील वाडीकर, (रा.सावंतवाडी) हे स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका जुगाराच्या आकड्यावर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळ खेळत असताना मिळून आले. यावेळी पोलिसांना त्याठिकाणी १४ हजार २६० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून सुमारे १४ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपीना या प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली तापसिक अंमलदार कृष्णा परुळेकर अधिक तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!