चार गुरे आगीमध्ये होरपळून जबर जखमी
मसुरे : मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी पडला तर यामध्ये या गरीब शेतकऱ्याची चार जनावरे होरपळून जबर जखमी झालेली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे या शेतकऱ्याचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या मंदार मुनगेकर याच्यापुढे शेती हंगामातच दुःखाचे सावट पसरले असून शासकीय पातळीवरती तसेच राजकीय पातळीवर मोठ्या मदतीची अपेक्षा येतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.