-4.2 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

आमदार निलेश राणे यांचा दशावतारांचा कैवारी उपाधी देऊन गौरव!

पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ, सिंधुदुर्गची बैठक संपन्न

कुडाळ : श्री गिरोबा देवस्थान बिबवणे येथे पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ, सिंधुदुर्ग यांची सभा पार पडली. या सभेला सिंधुदुर्ग कार्यकारिणीतील सदस्य. तथा प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष तसेच प्रतिनिधी असे एकूण 30 जण उपस्थित होते. अनेक वर्ष लढा देऊन नेहमी अपयशाशी झुंज देणाऱ्या दशावतार कलाकारांची यशाच्या मार्गा कडे वाटचाल करुन देणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा यावेळी दशावतारांचा कैवारी ही उपाधी देऊन गौरव करण्यात आला.

सर्वप्रथम आमदार निलेश राणे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व संस्कृतिक मंत्रालय अधिकारी यांच्याशी दशावतार कलाकार संघाची सभा घडवून दशावतार कलाकार नोंदणी तसेच अंगावरील पोशाख व अनेक समस्यांबाबत वाचा फोडत सिंधुदुर्गातील तमाम दशावतार कलाकारांचा पायलट प्रोजेक्ट तयार करून घेत न्याय दिल्याबद्दल दशावतारचा कैवारी ठरलेले आ. निलेश राणे तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्रालय अधिकारी, सदैव दशावतार कलाकार यांच्या पाठीशी असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत, दादा साईल देवेन सामंत, दत्तप्रसाद धुरी (मुंबई) तसेच या सर्वांना पेटाऱ्यातील गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो, असे म्हणत आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.
संस्कृतिक मंत्री शेलार यांच्या आदेशानुसार दशावतार शिफारस समितीवर या संघांचे 2 कलाकार सदस्य तसेच सिंधुदुर्गातील सर्व दशावतार कलाकारांची नाव नोंदणी तसेच कलाकारांच्या पोशाखासाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी अ, ब, क, ड, या वर्गानुसार कलाकार नोंदणी करण्यासाठी नियोजन बैठक झाली. आपल्या प्रत्येक तालुका संघाच्या अध्यक्षाकडे नाव नोंदणी करून अनेक वर्ष लढत असलेल्या न्याय हक्काचा पाया मजबूत करावा असे आवाहन सिंधुदुर्ग दशावतार कलाकार संघांचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम ( बाळू ) कोचरेकर यांनी यावेळी सिंधुदुर्गातील समस्त दशावतार कलाकारांना केले. तसेच सर्व कलाकारांनी एकजुटीने एकत्र यावे असे आवाहन करत संघातील उपस्थित कार्यकारिणी सदस्य तसेच प्रत्येक तालुका अध्यक्ष व प्रतिनिधी तसेच बिबवणे गावचे ग्रामस्थ आबा राऊळ यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!