कणकवली : शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री कै. सौ. उषा भास्कर पारकर यांचं १८ मे रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी पारकर कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच कै. सौ. उषा पारकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय कामतेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, बंडू गांगण आदी उपस्थित होते.