-7.7 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा होणार ३० मे रोजी सत्कार!

पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गुणगौरव

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना देखील गौरविणार

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. हा गौरव समारंभ शुक्रवार दि ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दुपारी २:३० वाजता पार पडणार आहे.

इयत्ता १० वी मध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील. कु.आर्या अजित राणे आणि कु. श्रेयश चंद्रशेखर बर्वे आणि कुडाळ हायस्कूल मधील कु.चैतन्या रुपेश सावंत या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्मितेश विनोद कडुलकर, रेश्मा पालव, विधी विरेंद्र चिंदरकर, ध्रुव आनंद तेंडुलकर, हर्षदा किसन हडलगेकर या पाच विद्यार्थ्यांनी ९९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नक्षत्रा राजेंद्र काळे या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. इयत्ता बारावी मधील विज्ञान शाखेतील जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेतील दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग तर वाणिज्य शाखेतील भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, परब तनुज निलेश या विद्यार्थ्यांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत कोकण विभागामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!