सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार आज १७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाच होण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा अशा प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.