कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याला २२ मे २६ मे या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान नागरिकांनी सावध राहावे असे आवाहना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवली असेल तर तात्काळ आपल्या तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासन, अधिकारी कर्मचाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.