2.5 C
New York
Tuesday, March 17, 2026

Buy now

अपघातग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची आमदार निलेश राणेंनी केली विचारपूस

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे आज सकाळी एका पोलीस गाडीचा अपघात झाला. या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल होऊन अपघातग्रस्त जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. तसेच रुग्णालय प्रशासनाला सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!