भारतीय सैन्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान : ना.नितेश राणे
कणकवली : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी कणकवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. शहरातील पटकीदेवी मंदिर येथून शुक्रवारी सायंकाळी ५:३० वा. बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालयपर्यंत ही तिरंगा रॅली यात्रा निघाली होती. दरम्यान यावेळी, भारत माता की …. जय, वंदे…. मातरम, अशा घोषणा देत ही तिरंगा रॅली यात्रा मार्गस्थ झाली होती. कणकवली येथील तहसीलदार कार्यालयाजवळ राष्ट्रगीताने या तिरंगा रॅली यात्रेचा समारोप करण्यात आला.