-11.9 C
New York
Friday, January 30, 2026

Buy now

दहावीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींचे यश ; सेम टू सेम गुण

मालवण : दहावी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या प्रशालेतील श्रुती आणि साक्षी पेंडूरकर या जुळ्या बहिणींनी समान गुण मिळवत प्राप्त केलेले जुळे यश लक्षवेधी ठरले. पेंडूर येथील न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये साक्षी योगेश पेंडूरकर आणि श्रुती योगेश पेंडूरकर या दोघींनी प्रत्येकी ९१.२० टक्के गुण मिळवीत शाळेतून प्रथम क्रमांक पटकावीला.

पेंडूर देऊळवाडी वेताळ मंदिर येथे राहणाऱ्या साक्षी व श्रुती यांनी घरातील प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश निश्चितच अनेकांसाठी प्रेरणा आहे. आई वडिलांनी कष्ट संघर्ष करून आम्हाला शिकवले. यापुढे विज्ञान शाखेतून पुढील शिक्षण घेऊन यश प्राप्त करू. आई वडिलांचे स्वप्न साकार करू असे श्रुती यांनी सांगितले. तर मिळालेल्या समान गुणांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या आम्ही एकत्र अभ्यास केला. चांगले मार्क मिळवणे हे आमचे लक्ष होते. मात्र समान मार्क मिळाले. चांगले मार्क मिळाले. याचा आनंद आहे. असे त्या म्हणाल्या.

प्रशालेतील सर्व यश प्राप्त विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूरचे अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घनःश्याम राणे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. तावडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!