सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल : विद्यार्थ्यांचे १०० टक्के निकालासह यश
कणकवली : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये कणकवलीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये अग्रेसर असणारे व अनेक विविध उपक्रमांसहित आधुनिक शिक्षण पद्धतींवर भर देऊन शिक्षणाचा वसा देत असणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली या शाळेचा १०० टक्केनिकालासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये नेत्र दीपक असे यश संपादन केले आहे. यामध्ये पर्णा पराग नायगावकर हिने ९८.८ टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला आहे. मानसी प्रशांत बोभाटे हिने ९८.६ टक्के गुण प्राप्त करत द्वितीय, सृष्टी संजय सावंत ९८.४ टक्के गुण प्राप्त करत तृतीय, उर्वी हर्षल गवाणकर व सोहम संदीप ढेकणे यांनी ९८ गुण प्राप्त करत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये एकूण १६ विद्यार्थ्यानी ९० टक्के च्या वरती गुण प्राप्त केले आहेत.








