कणकवली : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांचा यात समावेश असून या सोळा ठिकाणांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारी ४ वाजता नागरी संरक्षक दल यांचे मार्फत देशभरात नागरी संरक्षणाच्या अनुषंगाने रंगीत तालीम आजोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने रंगीत तालीमच्या उक्त स्वरूपानुसार कणकवली नगरपंचायती मार्फत प्रथम सायरन हा दुपारी ४ ते ४:०४ वा. च्या वेळेत सायरनच्या चढ उताराच्या स्वरूपातील आवाजात वाजविण्यात आला. तसेच दुपारी :१५ वा दुसरा सायरन वाजविण्यात आला. हा सायरन वाजविल्यानंतर विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर कणकवली नगरपंचायत अग्निशमन विभागामार्फत प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थिती मध्ये प्रथमोपचाराबाबत तात्काळ प्रतिसाद कसा देता येईल याबाबत आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे प्रात्यक्षिक झाले.
यावेळी उपस्थित सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचा-यांना हवाई हल्ला झाल्यास कोणती खबरदारी घेण्यात यावी याबाबत सदर मॉक ड्रिल मध्ये माहिती देण्यात आली. सदर प्रात्यक्षिक करिता कणकवली नगरपंचायत व तहसीलदार कार्यालय, अधिकारी व कर्मचारी, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, NCC चे विद्यार्थी, आरोग्य विभागाकडील १५ ते २० कर्मचारी व इतर शहरातील नागरिक असे एकून अंदाजे शंभर लोक उपस्थित होते.