द्वितीय हर्षवर्धन पाटील : तर टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखेची निकिता ताम्हाणेकर तृतीय
मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षा मार्च 2025 चा निकाल जाहीर झाला आहे. मालवण तालुक्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे. कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड ९४.६७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला आहे. तर याच प्रशालेचा हर्षवर्धन पाटील हा ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी निकिता ताम्हाणेकर ही ९१ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
मालवण तालुक्यातील 100 टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल पुढील प्रमाणे. यात वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आर्ट्स आचराचा निकाल शंभर टक्के लागला आहे. भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सौ. इ. द. वर्दम कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कै. सौ. जयश्री वामन प्रभू आर्ट्स आणि कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय काळसेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा व्होकेशनल शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आर. पी. बागवे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मसुरेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे.
कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड (९४.६७), हर्षवर्धन पाटील (९२) सिद्धी परब (८५.१७), कला – कोमल दहीतुले (७१), जान्हवी माळी (६५.३३), युगाली घोगळे (५५.३३) यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, अन्य संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय कला – काजल लुडबे (८१.३३ टक्के), तुलसी सकपाळ (७७.८३), तन्वी पराडकर (७७ टक्के), रीना बुटे (७४.५०), तनया परब (७०.८३), वाणिज्य – निकिता ताम्हाणेकर (९१) यशश्री पवार (८८), युक्ता सावंत (८६), जान्हवी आंबेरकर (८४.८३), शुभम गावडे (८४.८३), ऐश्वर्या पराडकर (८४.६७), विज्ञान – धनश्री शेटवे (८७), वैभवी मेस्त्री (८७), हितेश मालंडकर (८३.५०), अथर्व कदम (८०.१७), प्रणव चव्हाण (७८.३३), मॅकनील फर्नांडिस (७८), व्होकेशनल – दर्शना खरवते (६८.१७), नरहरी कोळंबकर (६२.८३), ज्योती सादये (६०), पीयूष मालाडकर (५९.१७), तन्वी चिंदरकर (५७.३३) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या कॉलेजमधून विशेष प्रविण्य श्रेणीत ४, प्रथम श्रेणीत २०, द्वितीय श्रेणीत ७९ तर उत्तीर्ण श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतून प्रथम – प्रणया सुभाष मांजरेकर (५०३ गुण), द्वितीय – पूर्वा निलेश कोरगांवकर (३९६), तृतीय – हर्षद राजेश पाटकर (३५४), विज्ञान शाखेतून प्रथम – ईशा विनय शिरोडकर (३६२), द्वितीय – भाग्यश्री यशवंत सावंत (३५२) व तनिषा सोनू वायंगणकर (३५२), तृतीय – संजू शांती चकलिया (३४५), वाणिज्य शाखेतून प्रथम – गौरी विनायक भोगले (४९९), द्वितीय – संजना सुनील हरकुळकर (४६२), तृतीय – हर्ष शिवदास चव्हाण (४५५) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, प्राचार्य हणमंत तिवले यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण वाणिज्य – यश सावंत (७६.१७), सोहम कासले (७२.८३), सायली चव्हाण (७१.८३), कला – आविश शेमडकर (३१० गुण), सिद्धी काजरेकर (२८३), प्रियांका मोडक (२६५) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, गोपीनाथ पालव, सर्व संचालक, प्राचार्य श्री. कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


