कणकवली : औषध कर्मचाऱ्यांची एकी आणि संघटनेचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. कोरोना सारख्या अनेक आपत्ती बऱ्याच वेळा येतात. तेव्हा औषध कर्मचारी फार जबाबदारीने काम करतात. असे गौरवोद्गार दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांनी काढले.
यावेळी ते कणकवली येथील गोपुरी आश्रमच्या हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ. गजानन मोतीफळे, जिल्हाध्यक्ष समीर ठाकूर, सचिव अभिजीत गुरव, उपाध्यक्ष साईश अंधारी, खजिनदार शेखर कुंभार तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ कर्मचारी हे उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात एकूण ३५ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात सर्व रक्तदात्याना संघटनेकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी दीपक घाडीगावकर, दीपक मेस्त्री, तसेच कणकवली तालुक्यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं.