23.3 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

खा. नारायण राणेंनी माझ्यावर व माझ्या निष्ठेवर बोलूच नये

मुलाच्या पक्षप्रवेश व उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेंना किती वेळा भेटले तेसगळ्यांनी पाहिले

सत्ताधारी पक्षात नेहेमी प्रवेश करून गद्दारी करणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये

माजी आमदार वैभव नाईक यांचे खा. नारायण राणेंना प्रत्युत्तर

मुंबई : नारायण राणेंना माझ्यावर बोलण्याचा कोणताही हक्क नाहीय. मी गेली दहा वर्षे आमदार होतो. पराभूत झालो तरी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आणि त्यांच्यासोबत काम करतोय. उदय सामंत हे माझे मित्र आहेत. परंतु त्यांना अडीच वर्षांपूर्वी सांगितले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं आहे आणि तीच आमची भूमिका आहे, अशा शब्दांत खासदार नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई येथे एका वृत्तवाहिनीशी माजी आमदार वैभव नाईक बोलत होते.

पुढे श्री. नाईक म्हणाले, नारायण राणे यांनी माझ्यावर बोलू नये. राणे स्वतः ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या पक्षात ते गेलेले आहेत. आणि त्यांनी त्या त्या पक्षाही नेहेमीच गद्दारी केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर अनेक वेळा जाऊन त्यांनी मुलाची उमेदवारी घेतलेली आहे. ज्या पक्षाचे ते केंद्रीय मंत्री होते त्या पक्षाला बाजूला करून उमेदवारी साठी मुलाला दुसऱ्या पक्षात पाठवलं आहे. त्यामुळे राणेंनी निष्ठेवर बोलू नये.

उदय सामंत याना मी वर्षभर भेटलोच नाही आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला आहे. हे त्यांना देखील माहिती आहे. कुडाळ मधील आभार मेळाव्यात त्यांना वाटलं असेल जे उमेदवार तिथे आमदार झाले त्या मेळाव्याला जो प्रतिसाद मिळाला, ज्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या त्यावेळी त्यांना वाटलं असेल की इथल्या आमदारांची कामगिरी सुमार आहे. मी उद्धव ठाकरेंसोबत ठाम आहे. माझी भूमिका देखील तीच राहील.

नारायण राणेंना प्रवेशासाठी कोण विचारायला गेलं ? नक्की मुळात राणे कोणत्या पक्षाचे खासदार आहेत. ते कोणत्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु माझ्या निष्ठेवर बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकर नाही.

गैरसमज पसरवण्यासाठी काही लोकांनी अफवा केल्या आहेत. विरोधाची भूमिका आमही ठाम पणे मांडत आहोत. त्या भूमिकेला छेद देण्यासाठी अस कोणीतरी बोलत असतील. परंतु आमची भूमिका ठाम आहे. आणि आम्ही प्रामाणिकपणे उद्धव ठाकरेंसोबत राहणार. एकनाथ शिंदे यांना मी कधीही भेटलो नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!