31.1 C
New York
Thursday, July 17, 2025

Buy now

कणकवली येथे विश्रांतीधाम आश्रम वर्धापन दिनानिमित्त उद्यापासून कार्यक्रम

कणकवली : येथील प. पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाचा बारावा वर्धापन दिन तसेच श्री गणेश मंदिर, गुरुवर्य प.पू. फलाहारीबाबा गुरुकृपाधाम आश्रम, अनुसया माता तपश्चर्या स्थान या वास्तूंचा तृतीय वर्धापन दिन सोहळा, फलाहारी बाबांची पाद्यपूजा, श्री सत्यनारायण महापूजा, गुरुदर्शन सोहळा असे कार्यक्रम नागवे रोड, निमेवाडी येथील अनुसया माता विश्रांतीधाम येथे २९ एप्रिल ते ३ मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

२९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गणेशमूर्तीवर तसेच प.पू.भालचंद्र बाबांच्या पादुकांवर अभिषेक, सायंकाळी ६ वाजता प.पू. फलाहारी बाबा यांचे कणकवलीत आगमन, ७ वाजता कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक ते विश्रांतीधाम आश्रमापर्यंत भव्य मिरवणूक, रात्री ९ वाजता आरती, महाप्रसाद होईल. ३० एप्रिल रोजी प. पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाचा बारावा वर्धापनदिन सोहळा असेल. सकाळी ६ वाजल्यापासून भूपाळी संग्रह काकड आरती, मंगलारती, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, गुरुवर्य फलाहारी बाबांची पाद्यपूजा, गुरुदर्शन सोहळा, सुश्राव्य भजने, दुपारी १२.३० वाजता मध्यान्हारती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता मनोज भालचंद्र मेस्त्री यांची गुरुवंदना (गायनसंध्या), रात्री ९.३० वाजता आरती, महाप्रसाद होईल.

१ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून भूपाळी संग्रह, काकड आरती, मंगलारती, ८ वाजाता श्री दत्तगुरुंच्या मूर्तीवर अभिषेक, ९ वाजल्यापासून श्री गुरुवर्य फलाहारी बाबांची पाद्यपूजा, ११ वाजता भजन, १२.३० वाजता मध्यान्हारती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता कुडाळ, पिंगुळी येथील ह.भ.प. प्रशांत धोंड यांचे कीर्तन, रात्री ९.३० वाजता आरती, महाप्रसाद होईल.

२ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून भूपाळी संग्रह, काकड आरती, मंगलारती, सकाळी ९ वाजल्यापासून श्री लक्ष्मीमातेच्या मूर्तीवर अभिषेक, गुरुवर्य फलाहारी बाबांची पाद्यपूजा, भजन, दुपारी १२.३० वाजता मध्यान्हारती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजन, रात्री ९.३० वाजता आरती, महाप्रसाद होईल. ३ मे रोजी श्री गणेश मंदिर, गुरुवर्य फलाहारी बाबा गुरुकृपाधाम आश्रम, अनुसयामाता तपश्चर्यास्थान वर्धापनदिन सोहळा सकाळी ६ वाजल्यापासून भूपाळीसंग्रह, काकड आरती, मंगलारती, श्री गणेश मूर्तीवर अभिषेक, गुरुवर्य फलाहारी बाबांची पाद्यपूजा, प. पू. देवी अनुसया माता समाधीवर अभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, विश्रांतीधाम आश्रम ते श्री स्वयंभू मंदिरापर्यंत श्री गणेश मूतीर्ची पालखी मिरवणूक, दुपारी १२ वाजता भजन, १.३० वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता कुडाळ येथील ह.भ.प. स्नेहलदीप सामंत यांचे कीर्तन, रात्री ९.३० वाजता वारकरी दिंडी, १० वाजता आरती, महाप्रसाद वाटप होईल. २९ एप्रिल ते ३ मे या कालावधीत कुडाळ येथील शशिपाल डिचोलकर हे श्रीराम रामेश्वरी ग्रंथाचे पारायण करणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभभाविकांनी घ्यावा, असे आवाहन प. पू. अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाच्या संचालक मंडळाने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!