बिडवलकर हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक करून आम्हाला न्याय द्या
कुटुंबियांनी शरद पवारांचे वेधले लक्ष
वेंगुर्ले : बिडवलकर हत्या प्रकरणात दोषी असलेले संशयित हे राजकीय लोकांशी संबंधित आहेत. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे. त्यामुळे मुख्य संशयिताला अटक करुन आम्हाला न्याय द्या, अशी मागणी बिडवलकर कुंटूबियांनी आज राष्ट्रवादीचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली. दरम्यान यातील बिडवलकर यांचा खून झाल्यामुळे त्यांची एकुलती एक मूकबधिर मावशीचा आधार हिरावला आहे. त्यामुळे तिला शासनाकडुन मदत व्हावी तसेच हे प्रकरण चालविण्याचा न्यायालयात विशेष वकील नेमण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातील बिडवलकर कुटुंबियांचे वकील किशोर वरक यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी शशिकला चव्हाण, आनंद चव्हाण तसेच अन्य कुंटूंबिय उपस्थित होते.