कणकवली : राजकारणात कोणी कोणाचा मित्रही नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू पण नसतो, हे पुन्हा एकदा उघड झाल आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांचा साठ वर्षाचा वाढदिवस सोहळा १९ एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी प्रमोद जठार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.! यावेळी संदेश पारकर व प्रमोद जठार यांनी गळाभेट करत काही राजकीय जुन्या गोष्टींना उजाळा दिला.