दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ विविध उपक्रम राबविणार
सिंधुदुर्गनगरी : जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी येथे ” जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” या उपक्रमाचा शुभारंभ एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आला. यावेळी दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ उपअधीक्षक अभियंता प्रज्ञा पाटील, कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव, कार्यकारी अभियंता श्रीमंगले व मंडळ कार्यालय तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने जल प्रतिज्ञा घेतली. कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव यांनी या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी श्री. माणगावकर यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
०००००