25.5 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

फेसबुक, इन्स्टा जपून वापरा; पोस्टवर पोलिसांची आहे नजर

कणकवली : फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रत्येक मेसेजवर सायबर क्राइमची विशेष नजर असते. सोशल कनेक्टिव्हिटी, व्यावसायिक व मनोरंजनाचे साधन म्हणून व्हॉट्सअॅपचा वापर केला जात असला, तरी त्याचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेत. त्यामुळे फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअॅप वापरताय, तोल सावरा, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.

धार्मिक तेढ, प्रक्षोभक वक्तव्य पडेल महागात

व्हॉट्सअॅप वा कुठल्याही समाज माध्यमावरून धार्मिक तेढ, प्रक्षोभक वक्तव्य करत असाल, तर सावधान ते महागात पडू शकते. सायबर पोलिस किंवा संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतात.

 काही जणांवर गुन्हे दाखल

सोशल मीडियावर सक्रिय राहणारे लोक हुशार असतात. तसेच काही लोक विनाकारण तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट करतात. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ग्रुप अॅडमिन आहात, ही पथ्ये पाळा!

देशविरोधी कटेंन्ट शेअर करू नका, अश्लील कटेंन्ट शेअर करू नका, वैयक्तिक व्हिडीओ, फोटो शेअर करू नका, हिंसा भडकावणाऱ्या पोस्ट शेअर करू नका. ग्रुपची नियमावली करा. ग्रुपमधील सदस्यांना आपल्या नियमावलीचे स्मरण नियमित राहील, याची आठवण करून द्या.

काय होते कारवाई?

फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्स अॅपवरून आक्षेपार्ह मेसेज, ऑडिओ, व्हिडीओ अपलोड, शेअर वा फॉरवर्ड केल्यास आयटी अॅक्टसह आयपीसीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला जातो.

सायबर पोलिसांकडून सायबर क्राइमविषयी जनजागृती करण्यात येते. सोशल मीडिया वापरा पण ते जपून वापरा. प्रायव्हसी सेटिंग्ज योग्यप्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो किंवा मेसेज शेअर केले पाहिजेत.
– अधिकारी, सायबर सेल

सायबर पोलिसांची विशेष नजर

सोशल मीडिया वापरकर्त्यावर सायबर पोलिसांची सूक्ष्म नजर आहे. कुणी धार्मिक तेढ, प्रक्षोभक वक्तव्य करत आहे का, कुणी फॉरवर्ड करत आहे का, कुणी चोरून चाईल्ड पॉर्न तर पाहत नाही ना? यावर सायबरचे लक्ष असते.

या गोष्टी टाळा

कुठलाही मेसेज कॉपी पेस्ट करणे टाळा. खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज टाळावेत किंवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असलेला मेसेज शेअर किंवा लाइक करताना पडताळून पाहावे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!