संकल्प प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आयोजन
कणकवली : ज्यांचे जन्मतःच ओठ किंवा टाळू दुभंगलेले आहेत अशा रुग्णांची ‘ऑपरेशन स्माईल’ व इंगा फाउंडेशनद्वारा केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल, बेळगाव येथे संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहेत. देश, विदेशातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ इत्यादींच्या देखरेखी खाली व मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया व पुढील उपचार मोफत केले जाणार आहेत.
या मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनी २० एप्रिलपर्यंत संकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अमोल भोगले यांनी केले आहे.
शस्त्रक्रिया बेळगाव येथे केल्या जाणार
रुग्णासोबत एका नातेवाइकासाठी मोफत भोजन, प्रवास व निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा रुग्णांची ओळख व शस्त्रक्रिया पूर्व तपासणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच होणार आहे. तर शस्त्रक्रिया बेळगाव येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल येथे होणार आहे.