16.5 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

कणकवलीत २१ एप्रिलला लोकशाही दिन

कणकवली : जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन तालुका स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबवण्यात येणार आहे. त्यानुसार तहसिलदार कार्यालय कणकवली येथे २१ एप्रिल २०२५ रोजी लोकशाही दिन सकाळी १०.३० वाजता साजरा करण्यात येणार आहे.

या लोकशाही दिनामध्ये ग्रामविकास, गृह विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, वनीकरण, परिवहन, BSXNXL, MXSXEDYCXL यासह सर्वच विभागामधील तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकशाही दिनाकरीता तक्रार अर्ज सादर करावयाचा असल्यास नमुना प्रपत्र १ अ सोबत आपला तहसिलदार यांना उददेशून अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व /अपिल्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर सदर अर्ज लोकशाही दिनाकरीता स्विकृत करता येणार नाहीत.

लोकशाही दिनात अर्ज स्विकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभागाच्या विभागप्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल व सदर विभागप्रमुख सदर अजार्तील विनंती बाबत केलेल्या कायवार्टीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील. सदर अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबददलचे नियम, शासनाची भूमिका, तरतूदी या बाबींचा विचार करुन लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील. तसेच जे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्विकृत करता येऊ शकणार नाही असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी ८ दिवसात पाठविण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करण्यात येईल. अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनी अथवा सदर दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देण्यात येईल, असे आवाहन कणकवली तहसिल कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!