कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर हळवल फाटा येथील वळणावर सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू कंटेनर क्रमांक ( जिजे ०४ एक्स ५०४९ ) रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी कंटेनर ची पहाणी केली असता कंटेनरची पुढील चाके, तुटून पडली होती. तर कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले होते.
मंगळवारी सायंकाळी अपघात झालेल्या कंटेनर मधील माल दुसऱ्या टेम्पोत टाकून माल पुढे वाहतूक करण्यात आला. तर संबंधित कंटेनर मालक घटनास्थळी दाखल झाला होता. या अपघाताबाबत अधिक माहिती मिळाली नाही. तर कणकवली पोलीस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद दाखल नव्हती.