पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील उबाठा सेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला.
प्रवेशकर्त्यांमध्ये हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य सादिका हुसेनशहा पटेल, सोसायटी सदस्य हुसेनशहा पटेल, माजी ग्रामपंचायत सदस्य आशिब अब्दुल पटेल, तसेच शाहरुख पटेल, सद्दाम नाईक, शाहरुख शेख, सरफराज शेख, मुदस्सर पटेल, सादिक पटेल, सुफियान पटेल, नुमान पटेल, बशीर शेमना, रिजवान पटेल, चांदसाब पटेल, न्यामद पटेल, जुनेद पटेल, माजे फकीर, अनस पटेल, सईद नाईक, असलम पटेल, शयन नाईक, अरफान पटेल, ओवरा मकानदार, हमित पटेल, इब्राहिम पटेल, राजू पटेल, राज मकानदार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजप पदाधिकारी संदेश सावंत, राजू पेडणेकर, अनिल खोचरे, चंद्रकांत परब, इम्रान शेख, आबा खोचरे उपस्थित होते.