फरीद काझी यांच्यासह वाघोटन दोन ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये दाखल
ना. नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास
ना. नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का
शिवसेना नेतृत्वावर नाराजी, भाजपच्या विकासकामावर विश्वास
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : उबाठा शिवसेना गटाचे देवगड तालुका युवा सेनाप्रमुख फरीद काझी यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत वाघोटन ग्रामपंचायत सदस्या श्रुती घाडी व दीपाली गोठणकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने, पडेल व विजयदुर्ग परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
उबाठा शिवसेना पक्षाच्या नेतृत्वशैली व कार्यपद्धतीला कंटाळून हे पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत. प्रवेश करताना, नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या जलद व सकारात्मक विकासकामांमुळे ते आता “विकास पुरुष” म्हणून संपूर्ण सिंधुदुर्गचे नेतृत्व करतील, अशी अपेक्षा नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या प्रवेश सोहळ्यावेळी भाजपचे पदाधिकारी बंड्या नारकर, अमोल तेली, उत्तम बिरजे, मिलिंद खानविलकर यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.