खासदार नारायण राणे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची असणार उपस्थिती
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाजारात समिती स्थापन होऊन २५ वर्षे झाली तरी मुख्य मार्केट यार्ड नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादित माल विक्रीसाठी जागा हक्काची जागा नव्हती. यासाठी बाजार समितीने नांदगाव येथे जागा घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना माल उत्पादित मालाच्या खरेदी – विक्रीसाठी हक्काचे मार्केट यार्ड उपलब्ध होणार आहे. या कामाच्या पाहिल्या टप्प्यातील इमारत बांधकामाचा आज माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे व महाराष्ट्र राज्य, पणन राज्य, शिष्टाचार तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे – नाम. जयकुमार रावल व राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग मार्केट यार्डचे भूमिपूजन होणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार दिपकर केसरकर, आमदार निलेश राणे, पणन संचालक महाराष्ट्र राज्य ,पुणे चे विकास रसाळ, कार्यकारी संचालक, पणन मंडळ पुणे चे संजय कदम, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघचे प्रविणकुमार नाहाटा, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सरव्यवस्थापक पणन मंडळ पुणेचे विनायक कोकरे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था. कोकण विभाग नवी मुंबईचे मिलिंदराव भालेराव, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा उपनिबंधक, सिंधुदुर्ग डॉ. सोपान शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सिंधुदुर्गचे यशवंत बुधावले, कृषी अधिकरी भाग्यश्री नाईकधुरे, उपविभागीय अधिकारी कणकवली जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सरपंच अनुजा रावराणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सभापती तुळशीदास रावराणे व प्रभारी सचिव प्रकाश दळवी तसेच सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी केले आहे.







 
                                    
