25.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली आर्थिक फसवणूक

कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत सात लाख २३ हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर (वय ४१ , रा. कोकिसरे खांबलवाडी) याला कणकवली पोलिसांनी शुक्रवार ४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. स्वप्निल बेळेकर याला शनिवारी ५ एप्रिल रोजी कणकवली न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. स्वप्नील बेळेकर याची बुधवारी पोलीस कोठडी संपणार असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबतची फिर्याद सर्वेश हरि भिसे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती.

सर्वेश भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ मे २०२२ ते ११ ऑक्टोंबर २०२४ या मुदतीत आरोपी स्वप्निल बेळेकर याने सर्वेश भिसे याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. तसेच तुला दहा ते बारा टक्के दरमहा परतावा दिला जाईल असे सांगितले या आमिषाला बळी पडून सर्वेश भिसे याने देवकन्या बिजनेस वर्ल्ड या कंपनीत १२ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर स्वप्निल बेळेकर यांना चार लाख ७७ हजार रुपये सर्वेश भिसे याला दिले मात्र उर्वरित सात लाख २३ हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे सर्वेश भिसे याला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले व त्याने कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत होते. त्यादरम्यान संशयित स्वप्निल बेळेकर याला पोलिसांनी वैभववाडी येथून चार एप्रिल रोजी ताब्यात घेत अटक केली. शनिवारी स्वप्निल बेळेकर याला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी संशयीताकडून फसवणूक केलेली रक्कम हस्तगत करणे तसेच आर्थिक फसवणूक असल्याने सखोल तपास करायचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती मात्र न्यायालयाने संशयीत स्वप्निल बेळेकर याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!